मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जुलै 2019 (14:11 IST)

समिरा रेड्डीला कन्या रत्नाची प्राप्ती

अंडरवॉटर फोटोशूट केल्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेली अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई झाली आहे. शुक्रवारी (12 जुलै) समीराच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. ही माहिती समीराने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यासोबतच तिने तिच्या मुलीचा एक फोटोही शेअर केला आहे. यापूर्वी समीराला एक मुलगा आहे.
 
“आज सकाळी आमच्या घरी एका लहान परीचे आगमन झाले आहे’, असे म्हणत समीराने तिच्या लहान बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. समीराने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर मोठ्या संख्येने शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी समीराने 9व्या महिन्यामध्ये अंडरवॉटर प्रेग्नंसी फोटोशूट केले होते. त्यानंतर तिने नो मेकअप असलेला एक व्हिडीओही शेअर केला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या प्रेग्नंसीविषयी प्रचंड चर्चा रंगली होती. समीराने 2002मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावून पाहिले आहे. मात्र, लग्नानंतर तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला आहे.