सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दुष्काळी लातुरात रसेल वायपर सापाने दिला ४० पिलांना जन्म

Indian Russell Viper
फोटो: प्रतीकात्मक
लातूर: लातूरचे सर्पमित्र प्रशांत जोजारे यांनी सारोळा भागात अत्यंत विषारी परड (रसेल वायपर) जातीचा साप पकडला. ही सर्पमादी आहे. या मादीने रात्री जवळपास ४० पिलांना जन्म दिला. परड फुंकतो त्यामुळे अंगावर चट्टे पडतात, प्रसंगी मृत्यूही ओढवतो अशी चुकीची धारणा समाजात आहे. पण खोटी आहे असं प्रशांत सांगतात. या मोठ्या परड सापापेक्षा पिलांमध्ये अतिजहाल विष असतं असं ते सांगतात.

धाडसाने, जीव धोक्यात घालून कसलाही साप पकडण्याचं कौशल्य प्रशांत यांच्यात आहे. मागे रेणापूरजवळच्या भल्या मोठ्या पडक्या विहिरीत असेच दोन भले मोठे परड होते. प्रशांत झाडाला दोरी बांधून विहिरीत उतरले. सापांना कसलीही इजा न होऊ देता त्यांनी जीवदान दिलं.