मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2019 (14:23 IST)

राहुल गांधी यांचे फोटो तास न तास बघत होती करीना, या एक्ट्रेस ने देखील म्हटले होते - 'तो फार क्युट आहे '

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आपला वाढदिवस पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांसोबत साजरा केला. राहुल यांचा जन्म 19 जून, 1970 रोजी दिल्लीत झाला होता. राहुल सोशल मीडिया स्टार आहे. त्यांच्या हातात देशातील सर्वात जुन्या पक्षाची कमान आहे. ते प्रत्येक वेळेस समीक्षक, मीडिया आणि लोकांच्या रडारावर राहतात. पण एक वेळ असा ही होता की फार मोठ्या प्रमाणात लोक खास करून मुली त्याच्या चाहत्या होत्या. ते बर्‍याच मुलींचे क्रश राहून चुकले आहे.  
काही दिवसांअगोदर एक्ट्रेस आणि मॉडल माहिका शर्माने तर राहुल गांधीच्या प्रेमात उपास देखील ठेवला होता. माहिका शर्माने इंस्टावर पोस्ट लिहून राहुल गांधीप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तिने लिहिले होते - ती चैत्र नवरात्र दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी करते कारण त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी यशस्वी ठरतील. पण माहिकाची दुआ काही काम आली नाही. 
हे काही पहिल्यांदा झालेले नाही की जेव्हा एखाद्या एक्ट्रेसचे मन राहुल गांधी यांच्यावर आले असेल. 'चढ़ती जवानी मेरी' फेम एक्ट्रेस नेगर खानने एका मुलाखतीत म्हटले होते की - राहुल गांधी मला फार क्युट वाटतो. त्याच्या चेहरा देखील एका अॅक्टरप्रमाणे आहे. मला त्याच्यासोबत काम करायचे आहे.  
या अगोदर करीना कपूर खान ने देखील राहुल गांधीवर क्रश होण्याची गोष्ट स्वीकारली आहे. करीनाला तर राहुलसोबत डेटवर देखील जायचे होते आणि त्याच्याशी गप्पा मारायच्या होत्या. याचा खुलासा तिने स्वत: वर्ष 2002मध्ये एका मुलाखतीत दिला होता. करीनाने म्हटले होतो, 'मला असे म्हणायला पाहिजे का, की मला तुम्हाला जाणून घ्यायचे आहे, हे विवादास्पद ठरेल...राहुल गांधी.' करीनाने पुढे म्हटले, 'त्यात काही तर आहे. मी मॅगझिनमध्ये जेव्हा त्यांचा फोटो बघते तेव्हा एकाच गोष्टीचा विचार करते की यांच्यासोबत गप्पा मारणे कसे राहील.'
 
राहुल गांधी यांना डेट करण्याच्या गोष्टीवर करीना पुढे म्हणाली होती, 'मी फिल्मी खानदानाशी संबंध ठेवते. तसेच राहुल गांधी यांचा परिवार राजकारणाशी निगडित आहे.   अशात त्यांच्यासोबत गप्पे मारणे किती मजेदार राहील.' पण वर्ष 2009मध्ये करीना ने या गोष्टीचा नकार दिला.