मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (12:11 IST)

मी साऊथचे सिनेमे सोडणार नाही : तापसी पन्नू

तापसी पन्नूच्या करिअरची सुरुवात दक्षिणात्य सिनेमांमधून झाली. सिनेमाबाबत तिने दक्षिणेतचे शिकले आहे. आता तापसी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र तरिही दक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करणे सोडणार नाही, असे तापसीने म्हटले आहे.
 
दरवर्षी दक्षिणेतील एक तरी सिनेमा आपण करत असल्याचेही तिने आवर्जुन सांगितले. आता तिला दक्षिणात्य भाषाही चांगल्याप्रकारे अवगत झाल्या आहेत. त्यापैकी काही भाषांमध्ये ती पारंगतही झाली आहे. त्यामुळे दक्षिणात्य सिनेमांमध्ये काम नाकारण्याचे कोणतेही कारण नसल्याचे तिने म्हटले आहे.
 
सिनेमा म्हणजे काय आणि त्यासाठी आपली तयारी कशी करायची हे आपण दक्षिणात्य सिनेमांमधूनच शिकल्याने तिने या इंडस्ट्रीला मनापासून धन्यवादही दिले आहेत. तिचा “गेम ओव्हर’ हा हिंदीबरोबरच तामिळ आणि तेलगूमध्येही रिलीज होणार आहे.
 
याशिवाय “सांड की आंख णि “मिशन मंगल’ हे तिच्याकडचे आगामी सिनेमे आहेत. “सांड की आंख’ मध्ये तापसी प्रथमच एका वृद्ध महिलेच्या रोलमध्ये दिसणार आहे. तिच्याबरोबर भूमी पेडणेकर देखील हातात रायफल घेऊन दिसणार आहे. “नाम शबाना’नंतर तापसीचा हा आणखी एक ऍक्‍शन रोल असणार आहे.