बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (13:52 IST)

पुणे : लोककलावंत विशाखा काळेनं 21 व्या वर्षीच संपवलं आयुष्य

Face book
कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यात एकही कार्यक्रम होऊ शकला नाही. हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून लोककलावंत आणि नृत्यांगना विशाखा काळेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. विशाखाने राहत्या घरीच आत्महत्या केली.
 
विशाखाला चित्रपटांमध्ये करिअर करायची इच्छा होती. पण तिचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला. त्यात तिच्या चेहऱ्याला जखम झाली आणि बरेच दिवस घरी बसावं लागलं.
 
विशाखाचे वडील अंध आहेत. आई एका शाळेत नोकरी करायची पण आता घर विशाखावरच अवलंबून होतं. वेगवेगळे स्टेज शो आणि लोककलांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन विशाखा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. पण कोरोनामुळे सगळी परिस्थिती पालटली. गेल्या 6 महिन्यात एकही कार्यक्रम होऊ शकलेला नाही. हाती असलेला पैसा संपत चालला आणि यामुळे कंटाळून विशाखाने टोकाचं पाऊल उचलल्याचं न्यूज 18 लोकमतच्या बातमीमध्ये आहे.
 
महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरवगाथा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून विशाखा काळे लावणी सादर करत होती.