शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (15:36 IST)

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंदच

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहे. नागरी उड्डाण संचालनालयानं या निर्णयासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. केंद्र सरकारनं देशातील परिस्थितीचा आढावा घेऊन अनलॉक ४ मध्येही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर संचालनालयानं हे परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद आहे.
 
देशातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. भारतात मागील काही दिवसांपासून करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिका व ब्राझीलपेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळून येत आहेत. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण जगात आतापर्यंत भारतातच आढळून आले आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्रानं आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यातून विशेष विमानसेवांना वगळण्यात आलेलं आहे.