रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (16:37 IST)

फडणवीस म्हणाले, माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही त्याचवेळी अजित पवार यांना आले हसू

“माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही”असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमाप्रसंगीबोलून दाखवलं. बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन झाले. 
 
या कार्यक्रमा दरम्यान देवेंद्र फडणवीस  भाषण करत असताना माईक मधून आवाज येत नव्हता, त्यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आवाज आवाज असं म्हणून लागले, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मास्क खाली घेत ”माझा आवाज कोणी दाबू शकत नाही.” असे विनोदाने म्हणाले हे ऐकताच फडणवीस यांच्या बाजूला असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हसू आवरले नाही.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात भव्य असे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या माध्यमांतून उपचारासाठी येणार्‍या रूग्णांना चांगले उपचार मिळाले पाहिजे. सध्याची वाढती रुग्ण संख्या ही चिंतेची बाब असून अधिकाधिक तपासण्या झाल्या पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.