शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 27 जानेवारी 2020 (12:48 IST)

भारताला सक्षम विरोधी पक्षाची गरज - अभिजीत बॅनर्जी

"कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्ष हा लोकशाहीचं हृदय असतो. सत्ताधाऱ्यांनाही सत्तेवर वचक राहावा म्हणून चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते. सध्याची परिस्थिती पाहता मला वाटतं भारताला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे," असं मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि नोबल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.
 
जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी हे मत व्यक्त केलं.
 
यावेळी बोलताना अभिजीत बॅनर्जींनी देशाच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. "अर्थव्यवस्थेच्या समस्येतून आपण लवकर बाहेर पडू असं वाटत नाही. त्यासाठी बराच काळ लागेल. अर्थव्यवस्था सुधारेल एवढा पैसा सध्या आपल्याकडे नाही. बँकिंग सेक्टरमध्ये पैसा लावू शकू अशी आपली परिस्थिती नाही," असं अभिजीत बॅनर्जींनी म्हटलं.