ऑडी Q8 भारतात लाँच विराट कोहली पहिला ग्राहक
लक्झरी कार बनवणार्या जर्मन कंपनीने ऑडी Q8 भारतात लाँच केली आहे. भारतात केवळ 200 कार विकण्यात येणार असून या कारचा पहिला ग्राहक भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली बनला आहे. या कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही कार 5.99 सेकंदात 100 किलोमीटरचा वेग पकडते. तसेच ताशी 250 किलोमीटर धावते.
ऑडीने आपल्या फ्लॅगशिप एसयूव्ही कार ट8 ला केवळ पेट्रोल इंजिनमध्ये उतरवले आहे.
Audi Q8 मध्ये बीएस 6 इंधन उत्सर्जन असलेला 48 व्ही माइल्ड-हायब्रिड सिस्टमसह 3 लीटर, व्ही 6 टर्बो - पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
या इंजिनचे पॉवर 340 एचपी आहे. तसेच 500 एनएम टॉर्क निर्माण करते. क्यू 8 चे इंजिनमध्ये 8 स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
ही ऑडी 5.9 सेकंदात शून्य ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडू शकते, असा कंपनीने दावा केला आहे. कारचा जास्तीत जास्त वेग 250 किलोमीटर प्रतितास आहे.
Audi Q8 SUV मध्ये 4.99 मीटर (16.4 फूट) लांबी, 2 मीटर (3.3 फूट) रुंदी आणि 1.71 मीटर (5.6 फूट) उंची आहे.
या कारमध्ये लगेज स्पेस जास्त दिला आहे. कारमध्ये सामान ठेवण्यासाठी 1,755 लीटर जागा दिली आहे. या कारची किंमत एक्स शो रु 1.33 कोटी रूपये इतकी आहे.