1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जानेवारी 2020 (16:50 IST)

'माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का?'

"माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, मी आता तो तयारही करू शकत नाही, तर मग मी भारतीय नाही का? 70 वर्षे या देशात केलेले वास्तव्य हा माझ्या भारतीय असण्याचा पुरावा नाही का?" असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी उपस्थित केला आहे.  
 
"नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विचार करत असताना, एक मुस्लीम म्हणून नाही तर देशाचा नागरिक म्हणून मला काळजी वाटते. माझ्या पाच पिढ्या या देशाच्या मातीत दफन आहेत. मी या देशाच्या सामाजिक जडणघडणीमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये काही योगदान दिले आहे. मग मी या देशाचा नागरिक नाही का? अस मत त्यांनी व्यक्त केलं."
 
यावेळी नसरूद्दीन शाह यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्यावरही निशाणा साधला. खेर हे एक 'जोकर' असल्याचं त्यांनी म्हटलं.
 
अनुपम खेर यांनी बुधवारी सायंकाळी एक व्हीडिओ ट्विट करून या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. "शाह यांच्या टीकेला आपण गांभीर्याने घेत नाही. ते ज्या पदार्थांचे सेवन करतात त्यामुळे त्यांना चूक आणि बरोबर यातील अंतर कळत नाही," असं खेर यांनी म्हटलं.