1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 22 जानेवारी 2020 (13:44 IST)

उद्धव ठाकरे - 'नाईट लाइफ' हा शब्द आवडत नाही

Uddhav Thackeray - I don't like the word 'night life'
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी 'मुंबई 24 तास' पुन्हा सुरू होणार, अशी घोषणा केली होती. यालाच अनेक जण 'मुंबई नाईटलाईफ'ही म्हणत आहेत.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र यासंदर्भात बोलताना मला 'नाईटलाईफ' हा शब्दच आवडत नाही, असं विधान केल्याची बातमी दिलीये.
 
IPS अधिकाऱ्यांच्या एका कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.
 
"प्रत्येक शहराची एक संस्कृती असते. त्यामुळे 'नाईटलाइफ'चा प्रस्ताव राज्यभर राबवणं योग्य ठरणार नाही. मुंबईत ठराविक ठिकाणी प्रायोगिक स्वरूपात हे राबवू शकतो. मुळात मला 'नाईटलाइफ' हा शब्दच आवडत नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
दरम्यान, 'नाईटलाइफ'मुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण येऊ शकतो, असं विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं.