शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 22 जानेवारी 2020 (12:08 IST)

'मुंबई' राज्यातील सर्वात प्रदूषित शहर

मुंबई हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा तीनपटीने खालावला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे. ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी एक पर्यावरणीय अहवाल सादर केला जातो. या वर्षीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. तर भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे हवा गुणवत्तेच्या बाबतीत धोक्याच्या पातळीत आली असून महाराष्ट्रातील २० शहरांचा यात समावेश आहे. 
 
जानेवारी २०१९ मध्ये भारतासाठी पहिला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. याअंतर्गत २०१७ पासून २०२४ पर्यंत शहरातील वायू प्रदूषणाचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रत्येक शहरासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रीनपीसच्या अहवालात असेही म्हटले आहे की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ १२२ सर्वाधिक प्रदूषित शहरे ओळखली आहेत.