मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 21 जानेवारी 2020 (17:37 IST)

जलीस अन्सारीची मुंबई तुरुंगात रवानगी

Jalis Ansari departs in Mumbai jail
मुंबईतून फरार झालेल्या आणि नंतर उत्तर प्रदेशात ज्याच्या मुसक्या आवळल त्या डॉ. बॉम्ब अर्थात डॉ. जलीस अन्सारीला मुंबईत आणण्यात आले आहे. राजस्थानातल्या अजमेर बॉम्बस्फोट मालिकेतील गुन्हेगार असलेला जलीस जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पॅरोलवर मुंबईत असताना त्याने  निसटणचा प्रयत्न केला मात्र तो महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने हाणून पाडला. 
 
अन्सारीला सध्या आर्थर रोड तुरुंगात आणण्यात आले आहे. तेथून त्याची रवानगी पुन्हा अजमेर मध्यवर्ती  तुरुंगात करण्यात येणार आहे. अन्सारी सध्या 69 वर्षांचा आहे. त्याच्या मुंबईतल्या घरातून त्याने शुक्रवारी पोबारा केला होता.