शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

राज ठाकरे महाअधिवेशनात करणार नव्या झेंड्याचं अनावरण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर तब्बल तेरा वर्षांनी प्रथमच पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन आज (गुरुवार) गोरेगाव येथील नेस्को संकुलात होणार आहे.
 
या अधिवेशनाचे उद्धाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होईल. अधिवेशनात मनसेचा झेंडा नवीन स्वरुपात सादर केला जाईल. पक्षाच्या राजकारणाची दिशा नेमकी काय असेल, हे राज ठाकरे या अधिवेशनात मांडतील. संध्याकाळी सहा वाजता ते कार्यकर्त्यांना संबोधतील.
 
या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते नेस्को संकुलात जमा झाले आहेत. राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे अन्य पदाधिकारीही गोरेगावमधल्या नेस्को संकुलात दाखल झाले आहेत.
 
मनसेच्या ट्विटर पेजवरच्या महाअधिवेशनासंदर्भातील व्हीडिओमध्ये 'विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा' असा उल्लेख आहे. मनसेच्या बॅनरवरही हेच शब्द झळकत आहेत.
 
त्यामुळे मनसे आता हिंदुत्वाच्या वाटेवर जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे? महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा असल्यामुळे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे.
 
याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं, की अयोध्येत राम मंदिर एवढीच हिंदुत्वाची व्याख्या नाहीये. हिंदुत्व किंवा कोणताही धर्म हा 'ड्युटी' या अर्थाने घेतला पाहिजे.