शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (08:20 IST)

आता बोला, थेट कोविड रुग्णालयामध्ये ‘दारू पार्टी’, फोटो झाले व्हायरल

झारखंडच्या धनबादमधील कोविड -19 रुग्णालयात दारू पार्टी झाली. ईथे कोरोना बाधित एक रुग्ण आपल्या वॉर्डातच दारू आणि कबाबचा आनंद घेत असल्याचे दिसून आला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा संक्रमित गुन्हेगार हातात बेड्या असतानाही दारू आणि कबाबची पार्टी करत प्रशासनाची खिल्ली उडवत आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची दखल घेत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करून धनबाद जिल्हा प्रशासनावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंवर नजर टाकल्यास हे दिसते की कोरोना संक्रमित गुन्हेगार आपल्या बेडच्या शेजारी टेबलासमोर बसलेला आहे. मेजवानीच्या सर्व वस्तू त्याच्या टेबलावर ठेवल्या आहेत आणि बेड्या घातलेल्या हातांनी एका फोटोत आपल्या ग्लासात महागडी दारू टाकताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत तो दारूला त्याच्या डोक्यावर घेत मोठ्या अभिमानाने फोटो काढताना दिसत आहे. जणू तो एखाद्या बार आणि रेस्टॉरंटमध्ये बसून पार्टी करत आहे.