संबंधित माहिती
- अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल
- अभिनेते प्रशांत दामलेंची फेसबूक पोस्ट हा कोरोना आणि ही बंधनं कधी संपतायत असं झालंय
- ‘पावनखिंड’ने रचला विक्रम, चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
- काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका, गायिका वैशाली भैसने ची फेसबुकवर पोस्ट
- स्मार्टफोनवर चित्रित पहिला मराठी चित्रपट 'पॉंडीचेरी'
‘पावनखिंड’बॉक्स ऑफिसवर हिट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा पावनखिंडहा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सध्या तिकीटबारीवरही याची जोरदार कमाई सुरु आहे. लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगितले आहे.
“मराठी चित्रपट पावनखिंड हा हिट ठरला आहे. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची घौडदौड कायम आहे. पहिला आठवडा – १२.१७ कोटी, आठवड्याच्या शेवटी – शुक्रवार १.०२ कोटी, शनिवार १.५५ कोटी, रविवार १.९७ कोटी…. एकूण – १६.७१ कोटी”, असे तरण आदर्श या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉट शेअर करत दिग्पाल लांजेकर यांनी हर हर महादेव असे म्हटले आहे.
