मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (21:42 IST)

अभिनेते प्रशांत दामलेंची फेसबूक पोस्ट हा कोरोना आणि ही बंधनं कधी संपतायत असं झालंय

अभिनेते प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांनी मराठी चित्रपट , नाटक आणि त्यांनी त्यांच्या विनोदी बुध्दीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. तसेच त्यांनी खवय्यांसाठीचे असलेल्या खास कार्यक्रमांमधून ते प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहेत.
 
प्रशांत दामले हे सोशल मीडियावर सक्रीय आहेत. अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कामध्ये असतात. प्रशांत दामलेंनी त्यांच्या फेसबुकपेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्या पोस्टमधून कोरोना आणि निर्बंधांबाबत भाष्य करून त्यांनी त्यांची व्यथा मांडली आहे, आणि ह्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलयं
 
प्रशांत दामले पोस्टमध्ये लिहिताना म्हणाले की,“माझी व्यथा…., नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारणं, तुमच्या सूचना ऐकणं हे सगळंच मी मिस करतोय. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा कोरोना आणि ही बंधनं कधी संपतायत असं झालंय.. सगळं पूर्ववत होऊ दे बाबा लवकर”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.