गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|
Last Modified बुधवार, 24 जून 2009 (15:38 IST)

स्वाईन फ्ल्यूमुळे सराव सामना रद्द

त्रिनिदाद व टोबॅगोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा वेगाने फैलाव होत असल्यामुळे भारतीय संघाचा सराव सामना रद्द करावा लागला. तसेच भारतीय संघास हॉटेल न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारत-वेस्ट इंडीज मालिकेतील पहिली लढत शुक्रवारी होणार आहे.

विडींज बेटात एचवनएनवन या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. यामुळे सध्या कोणताही धोका पत्करण्यास प्रशासन तयार नाही. भारतीय क्रिकेट संघास स्वाईन फ्ल्यूची लागण होऊ नये म्हणून हॉटेल न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.