1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

215 धावांनी विंडीज विजयी!

रोचची हॅटट्रिक

ND
वेस्टइंडिजने पहिले फलंदाजी करताना 8 विकेटवर 330 धावा काढल्या. त्याच्या उत्तरात हॉलंडने 31.3 षटकात 115 धावा काढल्या. 'ब' गटातील साखळी सामन्यात ख्रिस गेल, डॅरेन स्मिथ आणि पोलार्डच्या अर्धशतकांमुळे वेस्ट इंडीजला फिरोजशहा कोटला मैदानावरील सर्वोच्च ८ बाद ३३० धावसंख्या उभारता आली. नंतर सामनावीर रोच (६/२७) आणि सुलेमान बेन (३/२८) यांच्या गोलंदाजीपुढे 'नारंगी सेना' डचांची ३१.३ षटकात ११५ धावांत दाणादाण उडाली. टॉम कूपर (७२ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ५५) आणि काही प्रमाणात मुद्दसर बुखारी (२४) हेच त्यांच्यापुढे तग धरु शकले.

रॉचने या स्पर्धेतील पहिली व विश्वचषकातील ६ वी हॅट्ट्रिक नोंदविली. डावातील ३२ व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर अनुक्रमे पीटर सीलार, बर्नाड लूट्स पायचीत आणि बेरेंड वेस्टजिकला त्तिफाळाबाद बाद करीत त्याने हॅट्ट्रिकबरोबर विडीजचा विजयही साजरा केला. या विजयासह गेल्या ९ सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित करण्यात विडीजला यश आले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा