अनिल कुंबळेने दिला प्रशिक्षक पदाचा राजीनामा
भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचा संघ वेस्ट इंडिजकरता रवाना झाला. मात्र अनिल कुंबळेने संघासोबत न जाता लंडनमध्ये आयसीसीच्या बैठकीला हजेरी लावणं पसंत केल आहे.
गेल्यावर्षी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणाऱ्या अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची कामगिरी दमदार झाली होती. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.