शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

भारतीय संघात स्थान मिळवण्याची आशा!

मुंबई- आपल्या देशात कोणाताही खेळाडू जेव्हा खेळामध्ये कारकीर्द घडवण्याचा विचार करतो, त्या वेळी त्याचे एकच मुख्य ध्येये असते ते म्हणजे देशासाठी खेळायचे. माझेही हेच स्वप्न असून, या मोसमातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर लवकरच भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवेन, असा आत्मविश्वास महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज अनुपम संकलेचाने एका खास मुलाखतीमध्ये व्यक्त केला आहे.
 
अनुपम यंदाच्या स्पर्धेत विदर्भविरूद्धच्या सामन्यात 14 फलंदाज, तर आसामविरूद्ध 12 बळी बाद करीत महाराष्ट्रास निर्णायक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. 34 वर्षीय अनुपमने प्रथम दर्जाच्या 46 सामन्यांमध्ये 166 बळी मिळवले आहेत.