गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2017 (12:52 IST)

अनुष्का-विराटने केली नवीन घराची पाहणी

anushaka virat
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत सर्वात जास्त वेळ व्यतीत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हे दोघेही उत्तराखंडला गेले होते. विराट आणि अनुष्का यांचे सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते.
 
जवळपास आठवडाभराच्या सुट्टीनंतर हे दोघे ज्यावेळी परतले त्यावेळीसुद्धा विमानतळावर या दोघांनाही एकत्र पाहण्यात आले. उत्तराखंडमधून परतल्यानंतर हे दोघे सध्या नवीन घर पाहण्यासाठी गेल्याचे दिसले.
 
वरळीमध्ये फ्लॅट पाहण्यासाठी आल्यानंतरचे विराट अनुष्का यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
 
ज्या इमारतीमध्ये  दोघे फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते, त्या इमारतीचे नाव ‘ओंकार १९७३’ असे असल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या पसंतीनुसार या फ्लॅटचे काम सुरु आहे.