मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2023 (11:59 IST)

आशिया कप 2023 : पाकिस्तानचा अहमदाबादमध्ये खेळण्यास नकार

pakistan
आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच आता लोक वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाचीही वाट पाहत आहेत. मात्र, पाकिस्तानमुळे विश्वचषकाचे वेळापत्रक सातत्याने लांबत आहे. अलीकडे, असे मानले जात होते की विश्वचषक 2023 च्या तारखा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान घोषित केल्या जातील. पण हे होऊ शकले नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाकिस्तान अजूनही भारत दौऱ्याबाबत स्पष्टपणे काहीही बोलत नाही. 
 
नुकतीच आयसीसीची टीम पाकिस्तानात पोहोचली होती. पाकिस्तानकडूनही प्रतिक्रिया मागवण्यात आली होती. मात्र पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पीसीबीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने संघाच्या भारत दौऱ्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पाकिस्तानचा संघ तेथील सरकारकडून मिळणाऱ्या निर्णयावर अवलंबून असेल. पीसीबीने यासाठीची सर्व कागदपत्रेही संबंधित मंत्रालयाकडे पाठवली आहेत. सरकारची भूमिका जाणून घेतल्यानंतरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड निर्णय घेईल. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचा संघ 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणारा सामना खेळण्यास तयार नसल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात लीग मॅच होणार आहे. मात्र पाकिस्तान यासाठी तयार नाही. मात्र, पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर त्याला अहमदाबादमध्ये खेळण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळेच विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक लांबणीवर पडत आहे. 


Edited by - Priya Dixit