गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:17 IST)

WPL 2023 बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीगसाठीचे वेळापत्रक जाहीर केले

WPL 2023
महिला प्रीमिअर लीगसाठी (WPL Auction 2023)लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीगसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार WPL मध्ये एकूण 20 सामन असतील. तर ही स्पर्धा एकूम 23 दिवस चालणार आहे.
 
अंतिम सामना 26  मार्च रोजी
या वर्षी महिला आयपीएल अर्थात WPL 2023 ला येत्या चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिली लढत गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. चार मार्चापासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 26 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. हा अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
 
एकूण 20 साखळी सामने खेळवले जातील
WPL च्या या पहिल्या हंगामात एकूण 20 साखळी सामने खेळवले जातील. त्यानंतर 2 प्लेऑफसामने होतील. या स्पर्धेत एकूण चार दिवस दोन सामने खेळवले जातील. या चार दिवसांत पहिला सामना दुपारी तीन वाजता खेळवला जणार आहे. तर अन्य सर्व सामने रात्री साडे सात वाजता खेळवले जातील. एलिमिनेटर सामना 24 मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल.
Edited by : Ratnadeep Ranshoor