गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 18 डिसेंबर 2021 (14:59 IST)

BCCI ने पुष्टी केली की, केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघाच्या उपकर्णधारावरून सुरू असलेला सस्पेंस संपला आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी केएल राहुल प्रोटीज संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. रोहितचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना झाल्यानंतर लगेचच मुंबईत संघाच्या नेट सेशनदरम्यान, त्याच्या डाव्या पायाच्या स्नायूला तीव्र दुखापत झाली तसेच हाताला दुखापत झाली. भारत 'अ' संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळ हा कसोटी मालिकेसाठी सलामीवीर म्हणून रोहितचा पर्याय असेल.
 
कसोटी संघाचा उपकर्णधार होण्यापूर्वी राहुलला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी राहुल ने केली आहे. त्याने ही कामगिरी आयपीएलमध्येही सुरू ठेवली आहे, या मुळे त्याला ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.