गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (17:15 IST)

दीपक नाईकनवरे आहे तरी कोण, सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा दिग्गज खेळाडूही फिदा

क्रिकेट सामान्या आपल्या आगळ्यावेगळ्या अंपायरिंगने भारताच्या एक अंपायरने धमाल केली आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा अंपायर महाराष्ट्राच्या पंढरपूरच्या दीपक नाईकनवरे यांचा आहे. 
 
सोशल मीडियावर त्याची पंढरपुरच्या बिली बाउडेन सोबत तुलना होत आहे तर या डीएन रॉक्स या टोपण नावाने पुढे आलेल्या दीपक नाईकनवरे यांचेवर सध्या संपूर्ण सोशल मेडिया फिदा झाल्याचे दिसत आहे . 
 
त्यांच्या वेगळ्या शैलीच्या अंपायरिंगचे तर इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन देखील फिदा झाले आहे.
 
मायकल वॉनने ट्विटरवर दीपकच्या अंपायरिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच लिहिले आहे की आम्ही सर्व यांना इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल एलीट पॅनलमध्ये बघू इच्छित आहे.