मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (20:41 IST)

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दाखल केले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोलकाता येथील वुडलँड्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कोरोना अद्याप बरा झाला नसला तरी आता त्याच्यावर घरीच उपचार केले जाणार आहेत. माजी कर्णधार गांगुलीला आता कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागली असून या कारणास्तव त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
 
रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, माजी कर्णधार डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच आयसोलेशनमध्ये असणार आणि त्यांनाकोविडच्या ओमिक्रॉन व्हेरियंट ची लागण झालेली नाही. रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही आज दुपारी गांगुलीला डिस्चार्ज दिला आहे. पुढील पंधरवडा त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच राहावे लागणार आहे. त्यानंतर पुढील उपचाराचा निर्णय घेतला जाईल. 
गांगुलीला सोमवारी कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुलीचे भाऊ स्नेहशिष गांगुली यांनी सांगितले की, 'सौरवची प्रकृती स्थिर आहे, या वर्षाच्या सुरुवातीला त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती, त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.' 
गांगुलीने कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. भारतात कोविड-19 ची प्रकरणे अचानक वाढत आहेत, अशा परिस्थितीत केंद्र सरकारही लोकांना सतत खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहे.