शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (21:19 IST)

IND vs SA: BCCI ने वनडे संघाची घोषणा केली, के एल राहुलची कर्णधारपदी निवड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. केएल राहुलची वनडे संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. भारत 19 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे एकदिवसीय मालिका खेळू शकणार नाही. यापूर्वी तो दुखापतीमुळे कसोटी मालिकाही खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी केएल राहुलला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले.
जसप्रीत बुमराहला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. शिखर धवन आणि युझवेंद्र चहल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मोहम्मद शमीला वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. शिखर धवन आणि युझवेंद्र चहल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. ही मालिका देखील महत्त्वाची आहे कारण विराट कोहलीकडून मर्यादित षटकांचे कर्णधारपद परत घेतल्यानंतर ही भारताची पहिली एकदिवसीय मालिका आहे. रविचंद्रन अश्विन दीर्घ कालावधीनंतर वनडे संघात पुनरागमन करत आहे. अलीकडेच त्याने टी-20 विश्वचषक स्पर्धेत पुनरागमन केले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ: 
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.