New Zealand Team:कर्णधार विल्यमसन पुढील तीन मालिकेत न्यूझीलंडकडून खेळणार नाही
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्सविरुद्धच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या तिन्ही देशांविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात कर्णधार केन विल्यमसन आणि अनेक वरिष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. 10 जुलैपासून आयर्लंडमध्ये सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेत टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करेल. त्याचवेळी फिरकी अष्टपैलू मिचेल सँटनर टी-20 मध्ये संघाचा कर्णधार असेल.
जुलै महिन्यात न्यूझीलंड संघ आठ टी-२० सामने खेळणार आहे. यातील तीन सामने आयर्लंडविरुद्ध, तीन सामने स्कॉटलंडविरुद्ध आणि दोन सामने नेदरलँडविरुद्ध होणार आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितले की, खेळाडूंनी तंदुरुस्त राहणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी आणि टॉम लॅथम यांना विश्रांती देण्यात आली आहे.शेन जर्गेनसेन आयर्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान न्यूझीलंडचे प्रशिक्षक असतील. या मालिकेत प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनाही विश्रांती देण्यात आली आहे.