बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (16:22 IST)

ENG vs NZ: दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकली, न्यूझीलंडच्या संघात तीन बदल

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा संघ नियमित कर्णधार केन विल्यमसनशिवाय खेळायला आला आहे.दुस-या कसोटीपूर्वी, सामन्याच्या पूर्वसंध्येला केन विल्यमसनला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते, त्यामुळे ते सामन्याच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहे.
 
न्यूझीलंडचा संघ तीन बदलांसह मैदानात उतरला आहे.एजाज पटेलच्या जागी मॅट हेतरीचा, तर दुखापतग्रस्त कॉलिन डी ग्रँडहोमच्या जागी मायकेल ब्रेसवेलचा समावेश करण्यात आला आहे.हीच संधी केन विल्यमसनच्या जागी हेनरी  निकोल्सला देण्यात आली आहे. 
 
विल्यमसनच्या जागी टॉम लॅथमकडे न्यूझीलंड संघाची कमान सोपवण्यात आली आहे.लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने न्यूझीलंडवर 5 विकेट्सने मात केली.या सामन्यात जो रूटने कसोटी कारकिर्दीतील 26 वे शतक झळकावले.तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुस-या सामन्यात दमदार पुनरागमन करण्याचे न्यूझीलंडचे लक्ष्य असेल तर यजमान संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील. 
 
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन:टॉम लॅथम (कर्णधार), विल यंग, ​​डेव्हन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, काइल जेमिसन, टिम साउथी, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट