बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified बुधवार, 8 जून 2022 (23:28 IST)

IND vs SA : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी मुकाबला करेल,सामना कसा आणि कुठे पाहता येईल जाणून घ्या

IND vs SA: टीम इंडियाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 16 मार्च रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. यानंतर भारतासह जगभरातील खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त झाले. 
 
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आतापर्यंत एकूण 15 वेळा T20 मध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने नऊ सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने सहा सामने जिंकले आहेत. भारतीय भूमीवर दोन्ही संघ चार सामन्यांत भिडले आहेत. यामध्ये टीम इंडियाने केवळ एकच सामना जिंकला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तीन सामने जिंकले. 
 
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी गुरुवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
 
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता नाणेफेक होईल आणि पहिला चेंडू 7 वाजता टाकला जाईल.
 
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार स्टार नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे स्टार स्पोर्ट्सच्या वाहिनीवरही या सामन्याचे प्रक्षेपण होणार आहे. स्टार स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट सामने पाहू शकता.
 
भारताचा T20 संघ:  ऋषभ पंत (C/W), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (WK), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.