IND vs SA T20: दक्षिण आफ्रिके विरुद्ध राहुलचा जोडीदार कोण ?संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या
IND vs SA T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेत केएल राहुलला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. राहुल पहिल्यांदाच घरच्या भूमीवर भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या मालिकेत प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार केएल राहुल यांच्यासमोर सलामीची जोडी ठरवण्याचे मोठे आव्हान असेल. भारताच्या सध्याच्या T20 संघात चार खेळाडू डावाची सुरुवात करण्यास सक्षम आहेत. कर्णधार राहुलशिवाय इशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर हे सलामी देऊ शकतात, पण यापैकी कुणालाही संघातील स्थान निश्चित नाही.
राहुल संघाचा कर्णधार असून तो डावाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे.उर्वरित तीन खेळाडूंची कामगिरी आयपीएल 2022 मध्ये अपेक्षेप्रमाणे झाली नाही. अशा स्थितीत राहुलला योग्य सलामीची जोडी काळजीपूर्वक निवडावी लागेल.
1. ईशान किशन-
आयपीएल 2022 पूर्वी, इशान किशन भारतीय संघाचा भाग होता आणि त्यालाही डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. मात्र, किशनने कोणत्याही मालिकेत फारशी चांगली कामगिरी केली नाही. यानंतर आयपीएलमध्येही त्याची कामगिरी विशेष झाली नाही. किशनने या हंगामा मात 120 च्या स्ट्राईक रेटने आणि 32 च्या सरासरीने 418 धावा केल्या. नाबाद 81 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. या मोसमात त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतके झाली. असे असूनही राहुलचा जोडीदार होण्याच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. राहुलसह इशान किशन भारतासाठी डावाची सुरुवात करेल, अशी शक्यता आहे.
2. ऋतुराज गायकवाड
लोकेश राहुलसह भारतासाठी डावाची सलामी देणारा आणखी एक दावेदार म्हणजे ऋतुराज गायकवाड. गायकवाडने आयपीएल 2021 मध्ये ऑरेंज कॅप जिंकून भारतीय संघात स्थान मिळवले होते, परंतु त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्याला काही सामने खेळण्याची संधी मिळाली, पण त्याचा फायदा उठवता आला नाही. या मालिकेतही सुरुवातीला ऋतुराजला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
3. व्यंकटेश अय्यर-
व्यंकटेश अय्यरही टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करू शकतो, पण त्याला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.आयपीएल 2022 चा हंगाम व्यंकटेश अय्यरसाठी खूप वाईट होता आणि तो भारतासाठी फिनिशर म्हणून खेळला आहे. या मालिकेत त्याला फिनिशर म्हणून संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. हार्दिकने आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी केली आहे आणि तो भारतीय संघात खेळणार आहे. अशा स्थितीत वेंकटेशला पुढील सामन्यांमध्ये संधी दिली जाऊ शकते. एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास व्यंकटेश डावाची सुरुवात करू शकतो.
पहिल्या T20 साठी टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग-11 हे आहेत
केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, उमरान मलिक/ अर्शदीप सिंग.