1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Chris Gayle in hospital

गेल रूग्णालयात दाखल

वेस्टइंडिजचा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेल हा रूग्णालयात भर्ती आहे. त्याने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण त्या फोटोमध्ये तो कोणत्याही प्रकारे गंभीर स्थितीत असल्याचे दिसत नाही आहे. तो त्या फोटोत हसताना दिसतोय. त्याला ग्लुकोजची बॉटल चढवली असल्याचे दिसत आहे.
 
गेलला रूग्णालयात का दाखल केले याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ते अजून गुलदस्त्याच आहे. टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्विट करत यावर त्यांची विचारपूस केली आहे. सेहवागने ट्विट करत म्हटले आहे की, सगळ्या जगाचा किंग तू लवकरच बरा होशील आणि तू खूप वर्ष जगशील पण तुला काय झाले आहे.
पुढील लेख
वर्ल्ड खिताबच तिला दिला: सानिया