शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

वर्ल्ड खिताबच तिला दिला: सानिया

ब्रिस्बेन- ओपनचे जेतेपद सानियाने बेथानी हिच्या साथीत विजेतेपद मिळविले. पण या यशामुळे बेथानीने जागतिक क्रमवारीत सानियाला मागे टशकत अव्वल क्रमांक मिळविला. तेव्हा सानिया म्हणाली मला जणू काही मिस वर्ल्ड खिताबचा मुकुट तिला बहाल केल्यासारखे वाटते. आमची जोडी बरीच जुनी आहे.
 
यापूर्वी आम्ही एकत्र खेळलो तेव्हा सिडनीत जिंकलो. आ‍ता ब्रिस्बेनमध्ये आम्ही करंडक जिंकला. आम्ही कदाचित जास्त एकत्र खेळायला हवे, असे तिने सांगितले. बेथानी आधी पाचवी होती. सानिया 13 एप्रिल 2015 पासून अव्वल स्थानावर होती. तिने 92 आठवडे हा क्रमांक राखला. यात 31 आठवडे ती मार्टिना हिंगीसच्या साथीत संयुक्त अव्वल होती. गेल्या वर्षी तिने हिंगीसच्या साथीत ब्रिस्बेन, सिडनी आणि ऑस्ट्रेलियन ओपन या तीन स्पर्धा जिंकल्या होत्या.