शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (17:42 IST)

"टीम इंडियाचे अभिनंदन!" - श्रीमती नीता एम. अंबानी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे केले कौतुक

team india women
Congratulations to Team India "टीम इंडियाचे अभिनंदन!" - श्रीमती नीता एम. अंबानी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजयाबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक केले
 
श्रीमती नीता एम. अंबानी यांनी चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करत 19 धावांनी विजय मिळवला.
 
श्रीमती नीता एम. अंबानी म्हणाल्या, “आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! तुमच्या ऐतिहासिक विजयाचा देशाला अभिमान आहे आणि तो भावी पिढ्यांना प्रेरणा देईल. आमच्या महिला संघाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की योग्य मानसिकता, पाठिंबा, विश्वास आणि सामूहिक भावनेने त्या अजिंक्य आहेत!”
 
भारतातील महिला क्रिकेटसाठी हे वर्ष उल्लेखनीय ठरले आहे, ज्याची सुरुवात T20 विश्वचषकातील संघाच्या उत्कृष्ट कामगिरीने झाली आहे. त्यानंतर ऐतिहासिक डब्ल्यूपीएल आणि आता आशियाई क्रीडा स्पर्धेतही संघाने अप्रतिम कामगिरी केली.
 
आशियाई क्रीडा स्पर्धेत हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करत आहे. ज्याने महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्वही केले होते. मुंबई इंडियन्सने यंदाच्या महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले होते.