क्रिकेटपटूला कोरोना व्हायरसची लागण

Last Modified बुधवार, 18 मार्च 2020 (12:10 IST)
कोरोना व्हायरसने आता क्रिकेटच्या मैदानावर प्रवेश केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एका परदेशी खेळाडूला कोरोना झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील प्लेऑफचे सामने रद्द केले आहेत. पाक बोर्डाने संबंधित खेळाडूचे नाव जाहीर केले नाही. पण मीडिया
रिपोर्टनुसार इंग्लंडचा क्रिकेटपटू अ‍ॅलेक्स हेल्स याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हेल्स कराची किंग्स संघाकडून खेळत होता. पीसीबीने स्पर्धा पुन्हा कधी होणार याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

सुपर लीग स्पर्धा खेळणार्‍या एका खेळाडूला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. पण संबंधित खेळाडू पाकिस्तानमधून मायदेशात गेल्याचे पीसीबीने म्हटले आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू रमीज राजाने मंगळवारी दावा केला की स्पर्धा सोडून मायदेशात गेलेल्या हेल्समध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती.
ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 31 वर्षी हेल्सला आसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. हेल्सला कोरोना झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पाकिस्तान बोर्डाने संघातील सर्व खेळाडू, सपोर्टस्टाफ, अन्य
कर्मचारी यांची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम आम्ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय घेण्याचा निर्णय घेतला होता. पण सध्याच्या परिस्थितीत प्लेऑफचे सामने रद्द करण्याचा निर्णव योग्य ठरतो, असे पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली
जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय ...

रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही

रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही
महेंद्र सिंह धोनी निवृत्ती कधी घेणार यावर अनेकदा चर्चा सुरु असते. कारण इंग्लंडमध्ये पार ...

जडेजच्या पत्नीने केली 21 लाखांची मदत

जडेजच्या पत्नीने केली 21 लाखांची मदत
कोरोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला ...

क्रिकेटपटू स्मृती मंधाना होमक्वारंटाइनमध्ये

क्रिकेटपटू स्मृती मंधाना होमक्वारंटाइनमध्ये
भारतीय महिला क्रिकेट संघात सलामीला फलंदाजीसाठी येणारी स्मृती मंधानाला तिच्या सांगलीतील ...

खोट्या बातम्या देणे थांबवा, संतापली धोनीची पत्नी

खोट्या बातम्या देणे थांबवा, संतापली धोनीची पत्नी
भारताचा माजी कर्णधार आणि सर्वांचा लाडका क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी ...