गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: चेन्नई , मंगळवार, 17 मार्च 2020 (13:43 IST)

विमान उड्डाणांच्या मर्यादेमुळे आनंदचा जर्मनीतील मुक्काम वाढला

पाच वेळा विश्वविजेता ठरलेला भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद कोरोनाच्या धसक्यामुळे जर्मनीतच अडकला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुमारे 112 देशांमध्ये झाला आहे. भारतातदेखील कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत विमान उड्डाणांच्या मर्यादीमुळे आनंदयाचा जर्मनीतील मुक्काम वाढला असून त्याने स्वतःला सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. 
 
आनंद हा बुंडेस लीग बुद्धिबळ स्पर्धेसाठी जर्मनीत गेला होता. त्याचे परतीचे विमान 16 मार्चचे होते, पण विमान उड्डाणांच्या मर्यादामुळे आनंदला जर्मनीत थांबावे लागले.
 
सध्या जगभरात दहशत माजवणार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच देश खबरदारी घेत आहेत. कोरोनाचा फटका बसलेले देश शक्य त्या मार्गाने आपल्या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनेक देशांनी आपल्या देशातून बाहेर जाणार आणि बाहेरून देशात येणार विमान उड्डाणांच्या संख्या मर्यादित ठेवल्या आहेत. तसेच अनेक देशातील विमाने रद्द करण्यात आली आहेत. त्याचाच फटका आनंदला बसला असून नाईलाजाने त्याला जर्मनीतील आपला मुक्काम वाढवावा लागला आहे.
 
सध्या जगात कोरोना व्हायरस ज्या प्रकारे पसरतो आहे, त्यावरून एक सिद्ध होते की प्रत्येकाने योग्य खबरदारी घ्यायला हवी. आनंद जर्मनीत आहे. तेथील विमान उड्डाणांवर असलेले निर्बंध आणि प्रवाशांना देण्यात आलेल्या सूचना यामुळे एका जागी राहणे हेच हिताचे आहे. अधिक प्रवास करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोकत घालण्यापेक्षा जेथे आहात तेथे सुरक्षित राहाणे अधिक योग्य आहे, अशी माहिती आनंदची पत्नी अरूणा हिने दिली.