शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शनिवार, 11 जानेवारी 2020 (17:03 IST)

स्वामी विवेकानंद यांचे सुविचार

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यांनाच यश प्राप्त होते.
 
माणसा माणसांत अंतर म्हणजे
कोणामध्ये निसी:म आत्मविश्वास असतो
आणि कोणामध्ये तो नसतो.
 
ज्या माणसाच्या ठायी सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती
या तीन गोष्टी असतील
त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही.
 
स्वत:ला परिस्थितीचे गुलाम समजू नका
तुम्ही स्वत:च स्वत:चे भाग्यविधाते आहात.
 
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही
कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
 
समजूतदार व्यक्तीसोबत काही मिनिटे केलेली चर्चा
ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
 
जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की विष बनते...
मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो वा भूक असो...
 
प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते, नंतर विरोध आणि शेवटी स्वीकार
 
जोपर्यंत तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवत नाही
तो पर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही
 
जेव्हा सगळंच संपून गेलंय असं वाटतं
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची...