शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 एप्रिल 2018 (16:23 IST)

वन डे सामन्यांची चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने  2021 साली भारतात होणारी वन डे सामन्यांची चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द करून, आयसीसीनं त्याऐवजी ट्वेन्टी ट्वेन्टीच्या विश्वचषकाचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे चॅम्पियन्स ट्रॉफीऐवजी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक पाहायला मिळणार आहे.

वन डेचा विश्वचषक असताना आठ संघांचा समावेश असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीची गरज आहे का, असा प्रश्न सातत्यानं विचारण्यात येत होता. त्या प्रश्नाला अखेर आयसीसीनं कोलकात्यातल्या बैठकीत एकमतानं उत्तर दिल. आयसीसीनं 2021 साली सोळा संघांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचा पर्याय निश्चित केला आहे. त्यामुळे आता 2020 साली ऑस्ट्रेलियात आणि 2021 साली भारतात लागोपाठ ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकांचं आयोजन करण्यात येणार आहे.