गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 21 एप्रिल 2018 (09:43 IST)

फेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार

आता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ अॅण्डॉईडवर उपलब्ध आहे. कंपनी लवकरच हे फिचर आयफोन आणि डेक्सटॉपवर उपलब्ध आहे. याच्या मदतीने प्रिपेड मोबाईल युजर्स आपला मोबाईल रिचार्ज करु शकतात. पण अजूनही सर्वांना हे फिचर उपलब्ध झालेल नाही. ही सेवा येत्या २५ मेपासून सुरू होणार आहे.
 
यामध्ये सर्वात आधी स्क्रिनवर दिसणाऱ्या उभ्या रेषांवर क्लिक करावे. 'मोबाईल टॉप अप' नावाच ऑप्शन दिसेल.त्यावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ऑपरेटर निवडा. रिचार्ज रक्कम टाका. आपल्याला हवे असलेले प्लान शोधा. रिव्यू ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स टाका. प्लेस ऑर्डरवर क्लिक करा. फोनवर ओटीपी येईल. त्यानंतर फोन रिचार्ज होईल. 
 
प्लानबद्दल माहित नसेल तर ब्राऊज प्लानमध्ये जाऊन प्लान निवडा. आपला ऑपरेटरही हे एप स्वत:हून निवडत. तुम्हाला हव असल्यास ऑपरेटर बदलू शकता.