रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 एप्रिल 2018 (09:40 IST)

संकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा नाही…

संकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास वर्षानंतरही पवार साहेबांची प्रतिमा आहे तिच आहे. संकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा नाही, आता नवीन नेतृत्वाला पक्ष संधी देणार. घरवापसी करायची असेल तर पुन्हा नव्याने रांग लावा, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल दौऱ्यादरम्यान चिंचवड येथील सभेत घेतला.
 
आर.आर.पाटील आबा यांचा विसर 
मुख्यमंत्री जेव्हा हागणदारीमुक्त महाराष्ट्राची घोषणा करीत होते तेव्हा त्यांच्याकडून आर. आर. आबांच्या कामाचा किमान उल्लेख होईल असे अपेक्षित होते. कारण विरोधात असताना आर. आर. पाटील यांच्या कामाचा झपाटा आणि ग्रामस्वच्छता अभियानाचे यश त्यांनी अतिशय जवळून पाहिले होते. कदाचित उघडपणे त्यांनी आर. आर. आबांच्या नावाचा उल्लेख टाळला असला, किंवा त्यांना तसा उल्लेख करण्याबाबत पक्षीय राजकारणाच्या, राजकारणातील वरीष्ठांच्या खप्पामर्जीची भीती असावी. पण जेव्हा ते एकांतात जातील तेव्हा त्यांचे मन ओरडून ओरडून आबांच्या कार्याला अनुल्लेखाने मारल्याबद्दल जाब विचारेल यात शंका नाही" - खा.