सोशल मिडीयामुळे मानसिक आजारात वाढ
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात दर पाच महिलांपैकी एक महिला तर दर बारा पुरुषांपैकी एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतो आहे. यावरून मानसिक आजाराच्या बाबतीत महिलांचे प्रमाण चिंताजनक आहे. ब्रिटिश जर्नल आॅफ सायकिएॅट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरात दरवर्षी ५० लाख लोक मन:स्थितीतील बिघाड आणि चिंताग्रस्ततेचे आजार यामुळे मरण पावतात. सध्या जगभरात ४५ कोटींपेक्षाही जास्त लोक मानसिक रोगी आहेत. त्याचप्रमाणे पाच कोटी भारतीय अशा मानसिक अवस्थेशी लढत आहेत. २०२२पर्यंत ‘नैराश्य’ हा दुसरा सर्वांत मोठा आजार ठरणार आहे. सोशल मिडीयाच्या वापर करताना आभासी जगामध्ये प्रवेश करतात व यातून मानसिक आजार वाढत आहेत.
आकडेवारीनुसार मुंबई, दिल्ली, पुणे यांसारख्या शहरांमध्ये तरुण पिढी २४ तासांपैकी सर्वाधिक तास मोबाइलचा वापर करीत आहे. हा वापर करताना आभासी जगामध्ये प्रवेश करतात व यातून मानसिक आजार होण्याची दाट शक्यता असते.