गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 एप्रिल 2018 (10:57 IST)

राज ठाकरे आज ठाण्यात, शाखाध्यक्षांची घेणार कार्यशाळा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा १ मे पासून सुरू होत आहे. त्याआधी गुरुवारी अर्थात आज सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा होत असून त्याला राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी राज यांनी ठाण्यात मनसे गट अध्यक्षांचा मेळावा आयोजित केला होता. यात त्यांच्याकडून तक्रारी आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर, गडकरी रंगायतनसमोर त्यांची जाहीर सभा झाली. आता ते थेट पक्षातील पुरुष पदाधिकारी आणि सर्व शाखाध्यक्षांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारे प्रथमच कार्यशाळा होत असून पहिली कार्यशाळा ठाण्यात होणार आहे. त्यानंतर विविध शहरांत कार्यशाळा होतील, असे जाधव यांनी सांगितले. शहरात २२६ पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्या नी लोकोपयोगी कामे कशी करावीत, जनसंपर्क कसा वाढवावा आदी अनेक मुद्यांवर राज मार्गदर्शन करणार आहेत. राज हे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.