बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 एप्रिल 2018 (09:27 IST)

सरकार जागं झालं नाही तर जनताच यांचं सरण रचेल - नवाब मलिक

यवतमाळ जिल्ह्यातील दोन तर कर्जत येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यातला धक्कादायक प्रकार म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील माधव रावते या शेतकऱ्याने स्वतःचेच सरण रचून आत्महत्या केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी असे म्हटले आहे की सरकार जागं झालं नाहीतर जनताच यांचं सरण रचेल.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की शेतकऱ्यांनी स्वतःचेच सरण रचून आत्महत्या करणे ही महाराष्ट्रासाठी धक्कादायक बाब आहे. सरकारने मोठा गाजावाजा करत #कर्जमाफी योजनेची घोषणा केली. मात्र कोणत्याही शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळेच राज्यात आत्महत्यांची संख्या वाढत आहे. सरकारने घोषणाबाजी बंद करत प्रत्यक्षात काम करावे असेही ते म्हटले.