1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (15:08 IST)

दीपक चहरच्या पत्नीला जिवे मारण्याच्या धमक्या

भारतीय क्रिकेटर दीपक चहरची पत्नी जया भारद्वाजबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. जया भारद्वाज यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ही बातमी समोर आल्यापासून दीपक चहर सोशल मीडियावर वेगाने ट्रेंड करत आहे. दीपक चहर दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, अशा परिस्थितीत आता पत्नीमुळे तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.
 
दीपक चहरची पत्नी जया भारद्वाजसोबत झालेल्या गैरवर्तनानंतर चाहत्यांकडून आरोपीवर संताप व्यक्त केला जात आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे माजी व्यवस्थापक आणि त्यांच्या मुलावर जयासोबत फसवणूक केल्याचा आरोप आहे. जयाच्या सासऱ्याच्या म्हणजेच दीपकच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पारीख स्पोर्ट्स या हैदराबादस्थित कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयाने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या माजी मॅनेजरला एका व्यवसायासाठी 10 लाख रुपये दिले होते. मात्र पैसे परत मागितले असता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ज्या व्यवसायासाठी जयाने हे पैसे दिले होते, तो व्यवसाय सुरूच झाला नव्हता. अशा परिस्थितीत त्याने पैसे परत मागितले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
 
दीपकच्या वडिलांच्या तक्रारीनुसार जया यांनी 7 ऑक्टोबर 2022 रोजी आरोपींना नेट बँकिंगद्वारे 10 लाख रुपये दिले होते. हे पैसे ऑनलाइन व्यवसायासाठी पारिख स्पोर्ट्स अँड शॉपमध्ये स्टेक स्वरूपात दिले होते. मात्र पैसे मिळताच पारिख स्पोर्ट्स अँड शॉपचे मालक ध्रुव पारीख यांनी ते व्यवसायात न लावता हडप केले. त्यानंतर ते पैसे परत मागण्यासाठी जयाला जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागले. आता ध्रुव पारीख आणि त्याचे वडील कमलेश पारीख यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांनी मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले.