बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 28 सप्टेंबर 2024 (15:34 IST)

क्रिकेटर सरफराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात, थोडक्यात बचावला

Musheer Khan
मुंबईचे उगवते खेळाडू मुशीर खान यांचा उत्तरप्रदेश मध्ये रास्ता अपघात झाला असून त्यात ते गंभीर जखमी होऊन थोडक्यात बचावले आहे मुशीर त्याचे वडील-सह-प्रशिक्षक नौशाद खान यांच्यासोबत इराणी कप सामन्यासाठी कानपूरहून लखनऊला जात होते. त्याचवेळी अपघात झाला.

त्यांच्या मानेला दुखापत झाली असून आता ते लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर  1ते 5ऑक्टोबर दरम्यान भारताविरुद्ध इराणी चषक सामना खेळू शकणार नाही. एवढेच नाही तर 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या फेरीतूनही तो बाहेर असण्याची शक्यता आहे. 
 
मुशीर खान हा भारतीय कसोटी फलंदाज सर्फराज खानचा धाकटा भाऊ आहे . गेल्या मोसमात रणजी करंडक स्पर्धेतील बाद फेरीत मुंबईसाठी त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर, या हिवाळ्यात भारत अ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड निश्चित होती
 
कार अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि तो बरा होण्यास किती वेळ लागेल हे पाहणे बाकी आहे. या अपघाताबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
Edited by - Priya Dixit