बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (11:00 IST)

भारतीय क्रिकेटर उमेश यादवच्या वडिलांचे निधन

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला पितृशोक झाला. उमेशचे वडील तिलक यादव यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
उमेशचे वडील गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते आणि खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 2 दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले. तिलक यादव हे वलनी कोळसा खाणीत काम करायचे तसेच त्यांना कुस्तीची आवड होती. तिलक यांना दोन मोठ्या मुली आणि धाकटा मुलगा उमेश असे आहे.