सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (12:20 IST)

अपघातानंतर पंतने शेअर केला फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने शुक्रवारी अपघातानंतर इंस्टाग्रामवर त्याच्या रिकव्हरीचा फोटो शेअर केला. शेअर केलेल्या फोटोमध्ये पंत क्रॅचच्या साहाय्याने चालताना दिसत आहे.
 
One step forward, One step stronger, One step better एक पाऊल पुढे, एक पाऊल सामर्थ्याकडे आणि एक पाऊल सुधारण्याच्या दिशेने असे कॅप्शन त्याने दिले आहे. अशा स्थितीत त्यांच्या पोस्टवर चाहते लवकरात लवकर त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. 
 
यात पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगीने एक हृदयस्पर्शी टिप्पणी केली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा फोटो शेअर केल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीनेही कमेंट केली आहे. ईशा नेगीने पंतला फायटर म्हटले आहे. यासोबतच ईशाने हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. ईशाची ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
उल्लेखनीय आहे की युवा क्रिकेटर 29 डिसेंबर रोजी एका रस्ता अपघातात जखमी झाला होता. या अपघातात त्यांच्या कारला आग लागली. मात्र पंत वेळीच सुखरूप बचावले. तेव्हापासून त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार तो वेगाने बरा होत आहे. दुखापतीतून बरा होण्यासाठी आणि पूर्ण तंदुरुस्तीवर येण्यासाठी त्याला 6-9 महिने लागतील असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.