शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (17:56 IST)

Rishabh Pant: दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना ऋषभ पंतला कानाखाली मारायची इच्छा

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघाताचा बळी ठरल्यानंतर टीम इंडियातून बाहेर पडत आहे. 30 डिसेंबर रोजी पंत यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात पंत यांचे प्राण वाचले, मात्र ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर पंतवर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ते बराच काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते यंदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणे त्यांच्या साठी सोपे नसेल.
 
पंतला त्यांच्या तंदुरुस्तीवर खूप मेहनत घ्यावी लागेल आणि लयीत येण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल. त्यासाठी वेळ लागणारच आहे. पंत एक यष्टिरक्षक देखील आहे आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, पण यष्टिरक्षकासाठी पायाची ताकद खूप महत्त्वाची असते. त्यामुळे पंतला फिटनेस परत येण्यासाठी वेळ लागेल. दरम्यान, माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी पंतला त्या जीवघेण्या अपघातात झालेल्या दुखापतीतून बरे होताच त्यांच्या कानाखाली मारायची इच्छा दाखवली आहे, असे म्हटले आहे.
 
कपिल देव यांनी एका मीडिया हाऊसशी संवाद साधताना सांगितले की, पंतच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघ अडचणीत आला आहे. जसा पालकांना आपल्या मुलांनी चुका केल्या तर त्यांना कानाखाली मारण्याचा अधिकार आहे, तसेच कपिलला पंत बरे झाल्यावर तेच करायचे आहे.
 
कपिल म्हणाले  "माझं त्यांच्या वर खूप प्रेम आहे.पंत बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे जेणेकरून मी जाऊन त्यांच्या कानाखाली मारून त्यांना स्वतःची काळजी घेण्यास सांगू शकेन. पंतच्या अपघातामुळे संपूर्ण टीम तुटली आहे. मी त्यांच्या वर प्रेम करतो पण मला त्यांच्या राग ही येतो. आजच्या तरुणांकडून अशा चुका का होतात? यासाठी कानाखाली लावलीच पाहिजे."
 
माजी क्रिकेटपटू कपिल देव म्हणाले , "प्रथम आशीर्वाद, त्यांना  जगातील सर्व प्रेम मिळो, देव त्यांना  चांगले आरोग्य देवो. पण त्यानंतर, मुलांनी चूक केल्यास त्यांना चापट मारणे ही पालक म्हणून जबाबदारी आहे."
 
अपघातानंतर पंतवर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. रस्ता अपघातानंतर त्यांच्या कारला आग लागल्याने पंत भाजले. 25 वर्षीय ऋषभ वेळेतच गाडीतून बाहेर पडले  आणि त्यांचा जीव वाचला. मात्र, या अपघातामुळे पंत बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे
 
Edited By - Priya Dixit