सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 1 जानेवारी 2023 (15:56 IST)

ऋषभ पंतवर डेहराडून मध्येच उपचार होणार

अपघातानंतर ऋषभची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या मेंदूला आणि पाठीच्या कण्याला कोणतीही दुखापत झाली नाही. आता त्याच्या गुडघा आणि घोट्याचे स्कॅन होणे बाकी आहे. पंतच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या पायात फ्रॅक्चर झाले आहे, मात्र ते फारसे गंभीर नाही. तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांनी पंत यांची भेट घेतली आहे. पंतवर डेहराडूनमध्येच उपचार केले जातील, असे त्यांनी या बैठकीनंतर सांगितले. भारतातील सर्वोत्तम डॉक्टरांचा सल्ला घेऊन पंतवर उपचार केले जात आहेत.
 
ऋषभ पंतच्या कारला जिथे अपघात झाला त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. याठिकाणी ब्लाइंड स्पॉट असून त्यामुळे अपघात होतात.
एम्सचे डॉक्टर कमर आझम यांनी दावा केला आहे की पंतला बरे होण्यासाठी किमान तीन महिने लागू शकतात. ऋषभ पंतच्या कपाळावर टाके पडले आहेत, पण ही फार मोठी समस्या नाही. पंतसाठी सर्वात मोठी चिंता त्याच्या पायात फ्रॅक्चर असू शकते.
 
कार अपघातानंतर ऋषभ पंतला सावरण्यासाठी बराच वेळ लागेल. तो दुखापतीतून सावरू शकतो, पण त्याला मैदानात परतण्यासाठी वेळ लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि आयपीएल 2023 मध्ये खेळणे पंतसाठी कठीण आहे.
 
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी ऋषभ पंत यांची भेट घेतली. दोघांनी पंत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 
Edited By - Priya Dixit